अजब...! मी भारतभूमीवर पाऊल ठेवल्यावर कोरोना पळून जाईल...! परदेशात पळून गेल्याने महाराजाने केला दावा

अजब...! मी भारतभूमीवर पाऊल ठेवल्यावर कोरोना पळून जाईल...! परदेशात पळून गेल्याने महाराजाने केला दावानवी दिल्ली : देशातील जनता अजून दुसऱ्या लाटेत आक्रमण केलेल्या कोरोणाच्या विरोधात संघर्ष करत आहे. या संघर्षाला आशादायक यश मिळत आहे. रुग्णाची संख्या नियंत्रित होत आहे. आता यात स्वयंघोषित व पळून जाण्यात पटाईत असणारे नित्यानंद, यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला आहे की, जर, मी भारत भूमीवर पाऊल ठेवले तर कोरोना महामारी पळून जाईल.


काही दिवसापूर्वी स्वयंघोषित संत नित्यानंद याच्या एका शिष्याला कोरोना भारतातून कधी जाईल? यासंदर्भात विचारणा केली असताना, त्यांने सांगितले की, संत नित्यानंद यांच्या अंगात आता अम्मान देवीने संचार केला आहे, जेव्हा ते भारत भूमीवर पाय ठेवतील. त्यावेळी अपोआप कोरोना पळून जाईल. स्वयंघोषित नित्यानंद व त्याच्या शिष्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोकांनी त्याला मूर्खात काढले आहे. 


स्वयंघोषित संत नित्यानंद याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत. सन २०१९ मध्ये यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे, तो भारत सोडून फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तो कदाचित आयर्लंड इक्वाडोर समुद्रकिनाऱ्याच्या आसपास असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संत नित्यानंद याने अगोदर भारतीय पोलिसांची भेट घ्यावी, त्यानंतर त्यांना बेड्या घालून अतिशय सन्मानाने त्यांचे भारत भूमीवर स्वागत करण्यात येईल. भारतीय पोलीस त्यांच्या स्वागतासाठी इच्छुक आहेत, अशी इच्छा भारतातील तमाम जनतेने व्यक्त केली आहे


Post a Comment

0 Comments