पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या आटपाडी येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन : राजेंद्र खरात

पदोन्नती मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या आटपाडी येथे रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन : राजेंद्र खरातआटपाडी :  पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये  आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निर्देश दिले आहेत. 


त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घ्यावा या मागणीसाठी उद्या दिनांक ०७ रोजी रिपब्लिकन  पक्षातर्फे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आटपाडी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती  आरपीआयचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी दिले. 


राज्यभर तसेच मुंबईत ही अनेक ठिकाणी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण मागणीसाठी आंदोलन करण्यात आले  आहे. महाविकास आघाडी सरकार ने दलित आदिवासी मागासवर्गीयांच्या संयमाचा अंत पाहू नये असा ईशारा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिलेला आहे.


महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी चा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरले आहे. मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने त्वरीत घ्यावा या मागणीसाठी आटपाडी तहसील कार्यलयावर उद्या दिनांक ०७ रोजी रिपाइं तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments