Type Here to Get Search Results !

कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या कोचला आग



सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आग लागली आहे. या आगीत कोच जाळून खाक झाला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव काहीवेळ कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती. 


कोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती गाडीच्या सामान ठेवण्याच्या कोचला आज सकाळी साडे नऊच्या सुमारास आग लागली. झाराप स्टेशन जवळ ही आग लागली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आग विझविण्यासाठी कुडाळ एम आय डी सी, सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर आता नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीमुळे कोकण रेल्वे वरील वाहतूक सुरक्षितते साठी काही काळ थांबवण्यात आली होती. रेल्वे वाहतूक साडे अकरा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली आहे.


दरम्यान या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणासाठी काही वेळ कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ त्यहंबविण्यात आली होती. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीला या घटनेचा कोणताही धिक नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies