कोरोनाशी झुंज देत असलेल्या त्या नवजात बालकाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेवर उपस्थित झाले प्रश्न

कोरोनाशी झुंज देत असलेल्या त्या नवजात बालकाच्या मृत्यूने आरोग्य यंत्रणेवर उपस्थित झाले प्रश्नपालघर : पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी एका नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली होती. दुर्देवाने या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र, त्याची झुंज अपयशी ठरली.


पालघरमधील सफाळे येथील दारशेत, टेकरीचा पाडा या ठिकाणी राहणाऱ्या एका नवजात बालकाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हे बाळ जन्माला आल्यानंतर 12 तासाने त्याची कोरोना अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.


बालकावर पालघर ग्रामीण रुग्णालयात लहान बालकांसाठी कोणतीही आरोग्य सुविधा उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे, कोरोना लागण झालेल्या या बाळाला उपचारासाठी वणवण करावी लागली. उपचारासाठी बालकाला जव्हार येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस बाळाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे, त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले सहा दिवस हे बाळ मारणाशी झुंज देत होते. मात्र, त्याची ही झुंज अपयशी ठरली. 5 जून सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments