Type Here to Get Search Results !

“मग आमदार कशासाठी? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी?”




मुंबई : “१०० दिवस झाले असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचं सागितलं आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी भाजपा प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.

“कोविड काळात या मतदारसंघात हजारो लोक कोरोनाग्रस्त झाले असून आमदारांचा पत्ता नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी,” असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचं काम करत आहेत याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचं असल्याचं ते म्हणाले आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies