सर्दी झाली, खोकला आला ; ३ वर्षाच्या मुलीने गाठले थेट कोरोना तपासणीसाठी रुग्णालय

सर्दी झाली, खोकला आला ; ३ वर्षाच्या मुलीने गाठले थेट कोरोना तपासणीसाठी रुग्णालयकोहिमा : एक 3 वर्षाची मुलगी सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे कोरोनाची तपासणी करण्यासाठी एकटी आरोग्य केंद्रावर आल्याचे पाहिल्यावर आरोग्य केंद्रावरील सर्व लोक आश्चर्यचकित व आनंदित झाले होते.


ही घटना नागालँड मधील जुन्हेबोटो जिल्ह्यात घटाशी तालुक्यात घडली आहे. येथील एक 3 वर्षाची लहान मुलगी स्वतः आपली कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य केंद्रावर गेली होती. या मुलीचे नाव लिपवी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यादिवशी तिला आ सर्दी आणि खोकला झाल्याची सामान्य लक्षणे जाणवली होती. कोरोना ची शक्यता असल्यामुळे तपासणी करून घेण्याचा विचार तिच्या डोक्यात आला होता मात्र तिचे आई-वडील दोघेही शेतामध्ये कामाला गेले होते. त्यामुळे तीने स्वतः गावातील आरोग्य केंद्रात जाऊन आपली कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला होता.


सर्व नियमांचे पालन करत तोंडाला मास्क लावून आरोग्य केंद्रामध्ये गेली होती. जेव्हा तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तोंडाला मास्क लावलेली व एकटी असल्याचे पाहिले, तेव्हा तिची विचारपूस केली असता, तिने सांगितले की, मला सर्दी आणि खोकला आला आहे. त्यामुळे मी कोरोनाची तपासणी करून घेण्यासाठी येथे आली आहे. माझे आई-वडील दोघेही शेतात कामाला गेले आहेत. त्यामुळे मी एकटीच आली आहेत. असे सांगितले. हे ऐकून सर्व डॉक्टर व कर्मचारी चकित झाले होते. त्यानी या लहान मुलीसोबत आपले फोटो काढले व इंटरनेटवर व्हायरल केले आहेत. तिचे हे लहान वयातील साहस बघून सर्व लोक अभिनंदन करत आहेत.


ज्यावेळी लिपीला सर्दी खोकला झाला होता, त्यावेळी घरी आई वडील नव्हते.तरी ही तिने स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी एवढ्या लहान वयात दवाखान्यात जाऊन आपली चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला, तो निश्चितच कौतुक करण्यासारखा आहे. (सोर्स-महाराष्ट्र अपडेट) 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments