Type Here to Get Search Results !

“हा एक नवा हास्यास्पद प्रयोग..” : शरद पवारांच्या घरी होणाऱ्या बैठकीवरून भाजप नेत्याची टीका




मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस व शिवसेना वगळता इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. 

 “शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक… २० जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून, एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी बैठकीला उपस्थित राहणाऱ्यां नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies