सांगलीला 25 लाखांचे तीन व्हेंटिलेटर

 


सांगली :  पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी आपल्या फंडातून सांगली जिल्ह्याला २५ लाख रुपयांचे तीन व्हेंटिलेटरची जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, आमदार अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे उपस्थित होते.कोरोना काळात नागरिकांचे होणारे हाल आणि ऑॅक्सिजनअभावी अनेकांनी प्राण गमावले.यासाठी आमदार लाड यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती ओळखून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे रुपये 25 लाख किंमतीचे तीन व्हेंटिलेटर सुपूर्द केले.


रुग्णालयांमध्ये आजही व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. हिच बाब लक्षात घेऊन आमदार अरुण लाड यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यासाठी एक कोटींची व्हेंटिलेटर त्यांच्या निधीतून दिले आहेत. त्यातीलच पहिल्या टप्प्यात सांगली जिल्ह्यासाठी तीन व्हेंटिलेटर देण्यात आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured