ट्विटर-चिमणीने गिधाडरूपी केंद्राची जिरवली : जितेंद्र आव्हाड

ट्विटर-चिमणीने गिधाडरूपी केंद्राची जिरवली : जितेंद्र आव्हाडआटपाडी :  सध्या देशात केंद्र सरकार आणि सोशल मिडिया ट्विटर यांचा संघर्ष टोकाला गेला असल्याचे दिसत आहे. केंद्र सरकार आणि ट्विटर यांचा नवीन माहिती व तंत्रज्ञान नियमावरून वाद-विवाद सुरू आहे. केंद्र सरकारने ट्विटरसाठी नियमांची सक्ती केली आहे त्यामुळे ट्विटरने ही रीतसर नियमावर बोट ठेवत उपराष्ट्रपती, व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, मोहन भागवत यांच्यासह अनेक संघ परिवारातील नेत्यांच्या ट्विटर हँडलवरील ब्ल्यू टिक काढून टाकली आहे. त्यानंतर ती पुन्हा प्रस्थापित करण्यात आली आहे. मात्र त्यावरून केंद्र सरकारने ट्विटरला फक्त इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, केंद्र सरकारला टोला लगावला आहे की, मोठ्या गिधाडाना एका चिमणी भरी पडली आहे.केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात लागू केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक सोशल मीडिया कंपनीने २६ मे, पूर्वी भारतात निवासी तक्रार निवारण अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी आणि विभागीय संपर्क अधिकारी यांच्या नेमणुका करण्याची सक्ती केली आहे. या नियमास अनुसरून केंद्राने ट्विटरला सूचना केली आहे, परंतु ट्विटरने या नियमाचे पालन करण्यास विरोध केला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने ट्विटरला शेवटची नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकार व ट्विटर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावर, जितेंद्र आव्हाड यांनी एक दृश्य ट्विट केलं आहे. त्यामध्ये टवीटरचा चिमणी असलेला लोगो आहे. त्याला भगव्या रंगाने गोल केले आहे.  त्या गोलातच ट्विटर हे नाव लिहिले आहे. या फोटो बरोबर एक वाक्यही जितेंद्र आव्हाड यांनी लिहिले आहे. त्यात ते म्हणतात चिमणी गिधाडांना भारी पडली आहे.अशा पद्धतीने केंद्र सरकारला त्यांनी उपरोधात्मक टोला मारला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments