गाडीला लागलेल्या आगीत विटा येथील भाजीपाला व्यापाऱ्याचा मृत्यू

गाडीला लागलेल्या आगीत विटा येथील भाजीपाला व्यापाऱ्याचा मृत्यूविटा : येथील  शाहू नगरमध्ये झालेल्या भीषण दुर्दैवी घटनेत भाजीपाला व्यापाऱ्याचा मृत्यू  झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


आज (दि. ७) सोमवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान नेहमीप्रमाणे रघुनाथ ताटे यांनी त्यांच्या गाडीमध्ये (क्र. एमएच ०१ व्ही २४०९) भाजीपाल्याचा माल भरला. त्या नंतर हा माल विक्रीसाठी घेवून जाण्यासाठी ते गाडीत बसले. दरवाजा बंद केला. ताटे यांनी स्टार्टर मारला मात्र अचानक ठिणग्या उडू लागल्या आणि गाडीने अचानक पेट घेतला. क्षणार्धातच गाडी पूर्णपणे जळाली. रघुनाथ यांना घाडीतून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही आणि त्यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला.  


गाडीला लागलेली आग पाहून रघुनाथ यांच्या मुलाने आरडाओरडा केला. त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत रघुनाथ यांचा गाडीत होरपळून मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक बळवंत कान्हेरे अधिक तपास करीत आहेत.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसPost a Comment

0 Comments