Type Here to Get Search Results !

शंभर टक्के निधी आला पण, पन्नास टक्के निधीमध्ये केली कामे ; पन्नास टक्के निधीचा भ्रष्ट्राचार : भारतीय दलित महासंघाचे पुणे आयुक्त कार्यालया समोर बेमुदत उपोषण



माळशिरस/विष्णू भोंगळे : मौजे, भांबुर्ङी ग्रामपंचायत ता. माळशिरस, जि. सोलापूर या ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून दलित वस्तिमध्ये रस्ते, गटारी, पेव्हिंग ब्लाँक बसवणे, घरकुले प्राथमिक शाळेची डागङुजी, राष्ट्रीय पेयजल योजनेची पाईप लाईनया विकास कामा करिता लाखो रुपयांचा निधी शासनाने दिला. पण एकही काम शासकीय नियमाप्रमाणे झाले नसल्याने शंभर टक्के निधी आला आणि पन्नास टक्के निधीमध्येच कामे उरकून पन्नास टक्के भ्रष्ट्राचार झाला असल्याचे सांगत ग्रामपंचायत सदस्य विष्णु वाघमोङे (Vishnu Waghmode) यांनी आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले आहे.






दिनांक २०/०२/२०२० पासून पासुन गटविकास अधीकारी डॉ. स्मिता पाटील यांना तक्रारी अर्ज दिला असून ही त्यांनी याबाबत कोणतही दखल घेतली नाही. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही तक्रारी अर्ज  देवून त्यांनी ही या बाबत कोणतीही भूमिका घेतली नाही.






त्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांना दि. १९/०५/२०२१ रोजी संपुर्ण पुराव्यासह निवेदन दिले परंतु याही ठिकाणी दखल न घेतल्यामुळे भारतीय दलित महासंघाचे संस्थापक संजिव खिलारे (Sanjiv Khilare) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष दादासाहेब लोखंडे (Dadasaheb Lokhnade) यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २१ पासून विभागीय आयुक्त कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. चौकशी समिती नेमल्याचे लेखी पत्र मिळाल्या शिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे  उपोषणकर्ते विष्णु वाघमोडे म्हणाले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies