पंढरपूर : यावर्षीच्या आषाढी वारीसाठी सोमवारी पुणे येथे बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने वारकरी आषाढीवारी पाय काढण्यासाठी ठाम असल्याने आता सदरचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळात घेतला जाणार आहे.
सोमवारी पुणे येथे सर्व पालखी सोहळे, वारकरी प्रतिनिधी आणि प्रशासन यामध्ये झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता सदरचा निर्णय मुख्यमंत्री आणि कॅबिनेट समोर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
पालखी सोहळ्याने यंदा पायी सोहळ्यास परवानगी देण्याचा आग्रह धरला आहे. याबाबत सर्व प्रकारचे कडक निर्बंध वारकरी संप्रदाय पाळण्यास तयार असल्याचे संप्रदायाकडून सांगण्यात येत असून काही झाले तरी पायी वारीची परंपरा या वर्षी खंडित होऊ देऊ नका अशी संप्रदायाची मागणी आहे.
शासन निर्णय देईल तेवढ्या संख्येवर आणि दिलेले सर्व नियम पाळून पायी वारी करावी अशी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे. पुणे आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल येथे झालेल्या बैठकीतही हीच भूमिका पालखी सोहळे प्रमुख आणि वारकरी प्रतिनिधींनी मंडळींकडून प्रशासनाने यंदा कोरोनाचा धोका जास्त असल्याने हवे तर वारी संदर्भात इतर काही सवलती देऊ मात्र पालख्या बसनेच आणाव्यात अशी भूमिका घेण्यात आली.