Type Here to Get Search Results !

काय सांगता....भाजपची छत्री दुरुस्तीला आली काँग्रेस भवनला ! वाचा सविस्तर



आटपाडी : पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने पावसाळा आला असल्याने पुणे शहरामध्ये छत्री दुरुस्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या कायर्क्रमाची मात्र भाजप कडून जोरदार खिल्ली उडविण्यात आली होती. परंतु आता मात्र भाजपवाल्यांचीच पंचाईत झाली आहे.


 



कारण भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी वाटप केलेली एक छत्री काँग्रेस भवन मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यावरून आता काँग्रेसकडून मात भाजपची खिल्ली उडविण्यात आली आहे. छत्री दुरुस्ती उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे. खिल्ली उडवणारे विशेष महाभागनसाठी आज चा विशेष फोटो.  भाजपची छत्री दुरुस्तीला काँग्रेस भवनला आली आहे. असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंट फोटो वरून शेअर केले आहे.





त्यांच्या शेअर केलेल्या या फोटोनंतर भाजपचे अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दोन चिल्लर पक्षांच्या छता खाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंग च्या किमतीत 50 नव्या छत्र्या आल्या असत्या. असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. परंतु अतुल भातखळकर यांनी दिलेल्या याप्रत्युत्तर नंतर नेटकऱ्यांनी मात्र भन्नाट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies