Type Here to Get Search Results !

“कोरोना संकटात योग आशेचा किरण” : पंतप्रधान नरेंद्र मोदी





नवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. "संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण बनलेला आहे. कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील देशात आणि भारतात मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित झालेला नसला तरी योग दिनानिमित्त उत्साह कमी झालेला नाही," असं मोदी म्हणाले.

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जगातील बहुतांश देशांसाठी योग दिन हा त्यांच्या संस्कृतीचा भाग नाही. पण या कठीण समयी, एवढ्या अडचणीत लोक योग विसरु शकत होते. परंतु त्याउलट योगासनांनी लोकांचा उत्साह वाढवला आहे, योगासनांमुळे प्रेम वाढलं आहे." योग आणि व्यायामामुळे चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभतं. चांगलं आरोग्यच सर्व यशाचं माध्यम असल्याचं ते म्हणाले. तसंच योगामुळे शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही सकारात्मर परिणाम होतो. योगामुळे आपल्याला आपली विचारशक्ती समजते. योग आपल्याला निगेटिव्हीटीकडून क्रिएटिव्हीकडे घेऊन जातो असेही मोदी म्हणाले.

कोरोना महामारीचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, "जेव्हा कोरोनाच्या अदृश्य विषाणूने जगभरात पाय पसरले त्यावेळी कोणताही देश साधनं, सामर्थ आणि मानसिकदृष्ट्या यासाठी तयार नव्हात. परंतु आपण सगळ्यांनी पाहिलं की, अशा कठीण प्रसंगी योगासनं आत्मविश्वास वाढवण्याचं मोठं माध्यम बनलं.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies