Type Here to Get Search Results !

मातोश्री जिजाऊ या छत्रपती शिवरायांसाठी चालते बोलते विद्यापीठ होत्या : प्रा. डॉ.बी.पी.रोंगे : स्वेरीत 'शिवराज्याभिषेक दिन' साजरा



पंढरपूर : 'आजच्याच दिवशी, दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या त्यांचे चालते बोलते विद्यापीठच होत्या.बालवयात असलेली विचारांची प्रगल्भता व जाण या  गोष्टींची त्यांना मातोश्रींकडून शिकवण मिळाली होती. म्हणुन 'महाराजांनी जिजाऊ नावाच्या चालत्या- बोलत्या विद्यापीठातून पीएच.डी. घेतली' असं म्हटलं तर मुळीच वावगे ठरणार नाही असे प्रतिपादन स्वेरी चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.


गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इंस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'शिवराज्याभिषेक दिन' साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांविषयी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे हे मनोगत व्यक्त करत होते.


प्रारंभी भव्य अशा शिवमुर्ती ची प्राचार्य रोंगे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाविद्यालयाच्या  प्रत्येक विभागात ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.यावेळी रणवीर माणिक मोरे या चिमुकल्याने बाल शिवाजीचा सुंदर रित्या वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी झाला होता तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात प्रा.यशपाल खेडकर यांनीही छत्रपती शिवराय यांच्या जीवनावर विचार मांडले. 


अनेक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध घटना दर्शविणाऱ्या पोस्टर्स चे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते. या ऑनलाईन कार्यक्रमामध्ये अभियांत्रिकी (पदवी व पदविका) एमबीए तसेच कॉलेज ऑफ फार्मसी (पदवी व पदविका) मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याप्रसंगी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार व प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील, डॉ. एम.एम.आवताडे, इलेक्ट्रिकल सुपरवायझर एस. जी. जाधव, समाधान मोरे, सुहास तगारे, इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. संदीपराज साळुंखे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies