पी. व्ही. नरसिंहराव व यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सचिव राम खांडेकर यांचे निधन

पी. व्ही. नरसिंहराव व यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सचिव राम खांडेकर यांचे निधन
नागपूर   राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचे स्वीय सचिव राम खांडेकर यांचे दीर्घ आजाराने नागपुरात निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना अखेरचा श्वास घेतला.
पंतप्रधान कार्यालयातील पी.व्ही. नरसिंहरावांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. या सर्व अनुभवांवर त्यांनी पुस्तक लिहिले होते. सत्तेच्या पडछायेत हे त्या पुस्तकाचे नाव आहे. खांडेकर यांनी महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खासगी सचिव म्हणून देखील काम पाहिले. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.  


संपादक राजीव खांडेकर यांनी याबाबत ट्वीट करीत सत्तेच्या परिघात राहूनही त्यापासून लांब राहिलेले सज्जन, पितृतूल्य व्यक्तिमत्व गेले असे सांगत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 


Post a Comment

0 Comments