Type Here to Get Search Results !

अपेक्स हॉस्पिटलच्या डॉ. महेश जाधव ला बेड्या : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल



सांगली : अपेक्स हॉस्पिटलचा  संचालक डॉ. महेश जाधव याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विनापरवाना कोविड सेंटर चालवून निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्यावर गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच त्याने सत्र न्यायालयात अटक पूर्व जमीनसाठी अर्ज केला होता. परंतु त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्यास पाठलाग करून कासेगाव पोलीस ठाणेच्या हद्दीत त्याला जेरबंद केले.




अपेक्स हॉस्पिटल प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून डॉ. महेश जाधव हा पोलिसांना गुंगारा देत होता. शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली. आपला जामीन अर्ज फेटाळण्यात आला असल्याचे त्याला समजताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास बेड्या ठोकल्या.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies