Type Here to Get Search Results !

धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा




सांगली दि. 22 : कृष्णा, कोयना व वारणा मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग सुरु असलून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळी वाढत होत आहे. कृष्णा नदीवरील आयर्विंन पुलाची पातळी दिनांक 23 जुलै 2021 रोजी सकाळ पर्यंत अंदाजित 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता  ज्योति देवकर यांनी वर्तविली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.



सांगली पाटबंधारे विभाग यांच्यावतीने नदी काठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळोवेळी अद्यायावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. असेही कळविले आहे. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पुर नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 0233-2301820, 2302925 वर संपर्क साधावा. 



तसेच कृष्णा, कोयना व वारणा मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने दिनांक 22 जुलै 2021 रोजी सायकाळी 5 वाजे पर्यंत कृष्णा नदीवरील आयर्विन पुल येथील पाण्याची पातळी 24 फुट इतकी आहे. आज दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रमुख धरणातील विसर्ग पुढील प्रमाणे आहे.  वारणा धरणातून 6 हजार 8 क्युसेस, कोयना धरणातून 2 हजार 100 क्युसेस, कण्हेर धरणातून 1 हजार 563 क्युसेस, उमरोडी धरणातून 2 हजार 119 क्युसेस इतका आहे. अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता  ज्योति देवकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. 


 “माणदेश एक्सप्रेस” ॲप आता “गुगल प्ले स्टोअर” वर ; फ्री डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies