वैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीरमहुद : संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणार कोरोना योद्धा पुरस्कार चिकमहुद (ता. सांगोला) येथील पत्रकार वैभव काटे यांना नुकताच जाहीर झाला असून दिनांक 25 जुलै रोजी संत रोहिदास समाज मंदिर महूद येथे मान्यवरांच्या हस्ते दिला जाणार आहे.या कार्यक्रमासाठी देवी जॉन फुलारे (सोलापूर महानगरपालिका नगरसेवका), उदयसिंह भोसले (उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा), राजश्री पाटील (डीवायएसपी,मंगळवेढा), संगीताताई धांडोरे (समाज कल्याण सभापती, सोलापूर), अभिजीत पाटील (तहसीलदार सांगोला), सुहास जगताप (पोलीस निरीक्षक), संतोष (राऊत गटविकास अधिकारी) अशोक लामतुरे, राहुल खाडे, रामचंद्र कवडे, संजय शिंदे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कांबळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहुन या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. 


आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या तसेच कोरोना काळामध्ये विविध विषयांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेसमोर आणणाऱ्या पत्रकार वैभव काटे यांना तसेच आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळामध्ये जनतेची सेवा करत आहेत अशा डॉक्टर्स, नर्स ,आशा वर्कर ,पोलीस ,सरपंच ,यांना तसेच विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तींना संत रोहिदास मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कार विजेत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured