आटपाडीत सफरचंद सौदे सुरु I माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते गाडीचे पुजनमाणदेश एक्सप्रेस न्युज I धिरज प्रक्षाळे : 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चालू सीजन मधील पहिल्या सफरचंद गाडी चे उद्घाटन व पुजन सोहळा आटपाडी बाजार समितीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख डाळिंब मार्केट या ठिकाणी आटपाडी तालुक्याचे माजी आद्मार राजेंद्रआण्णा देशमुख व भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मंगलमूर्ती उद्योग समूहाचे संस्थापक व कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी चे संचालक पंढरीनाथ (नाना) नागणे यांच्या प्रयत्नातून मागील दोन वर्षांपूर्वी चालू केलेल्या सफरचंद सौद्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या हिमाचल प्रदेश मधील शिमला येथील सफरचंद येथे आहेत. 

यावेळी पंचायत समिती सभापती माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, आटपाडी चे उपसरपंच प्रा.डॉ. अंकुश कोळेकर प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन उत्तम जाधव, बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव, नारायण ऐवळे, डी.टी पाटील, पंचायत समिती सदस्य रुपेश पाटील, वसंतशेठ खराडे, बाळासो सरगर, शहाजी पाटील, संभाजी देशमुख, आण्णासो सरगर, वसंत नसले, राजेंद्र बालटे, नानासो थिटे, रमेश नसले, किरण कदम, सुनील तळे, योगेश माने, विजय खळगे, दिपकशेठ नागणे, विजय कदम, सुनील सरगर, अंकुश पुजारी, नेताजी देशमुख, सोमनाथ भंडारे, लक्ष्मण पुजारी, दत्तात्रय मरगळे, हणमंत सरगर, सुनील काळे, याच बरोबर आडते व व्यापारी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured