Type Here to Get Search Results !

‘डी मार्ट’ च्या नावावर व्हायरल होणारी गिफ्टची बातमी खरी? का खोटी? : वाचा सविस्तर



माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. १९ ऑगस्ट I आटपाडी :  सध्या सोशल मिडीयावर एखादी बातमी खरी आहे किंवा खोटी आहे याची कोणतीही शहनिशा न करता अनेक बहाद्दर ती सगळ्यात आधी बातमी आपल्यालाच मिळाली आहे या अविर्भावात सगळ्या सोशल मिडीयामध्ये शेअर करीत असतात. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडत असतो. परंतु नेमकी ती बातमी खरी आहे का? खोटी याची कल्पना येत नसते. 



सध्या असाच काहीसा प्रकार सोशल मिडीयाचा प्रमुख अंग असलेल्या ‘व्हाटसअप’ वर पहायला मिळत आहे. राज्यातील सर्व मॉल कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे एप्रिल पासून बंद आहेत. परंतु राज्यातील कोरोनाचा निर्बंध आता हळूहळू शिथिल होवू लागले आहेत. त्यामुळे राज्यामध्ये आता सर्वत्र मॉल सुरु होवू लागले आहेत. मॉल सुरु झाल्यामुळे राज्यातील प्रमुख मॉल असलेल्या डी मार्ट च्या नावाने सोशल मिडीयामधून एक लिंक व्हायरल होत आहे. की, यामध्ये लिहले आहे “डीमार्ट आपल्या विसाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत भेटवस्तु, देत  असून सदरही लिंक आपल्या मित्रांना शेअर करा अशा आशयाची पोस्ट आहे.”  याबाबत आटपाडी येथील चौंडेश्वरी पतसंस्थेचे व्हा. चेअरमन राहुल सपाटे यांनी माणदेश एक्सप्रेसशी संवाद साधत याबाबत खात्री करून नागरिकांना सावध करावे असे आवाहन केले होते.



त्यानुसार डी मार्ट ची स्थापना ही सन २००२ साली स्थापन झाली असून त्यास २०२१ साली १९ वर्ष पुर्ण होत आहेत. म्हणजेच ही व्हायरल होणारी बातमी खोटी आहे हे सिद्ध होत आहे. त्याच बरोबर डीमार्ट ने त्यांच्या वेबसाईट वर एक नोटीस देखील दिली आहे. त्यामध्ये लिहले आहे की, प्रिय ग्राहक: डीमार्ट कुठल्याच अन्य वेबसाईट किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे व्हाउचर्स किंवा कूपन्स देत नाही आहे. आमचे सगळे प्रोमोशन्स आणि ऑफर आमच्या डीमार्ट रेडी ऐप, आमची वेबसाईट www.dmart.in आणि आमच्या डीमार्ट स्टोर्स वर उपलब्ध आहे.



त्यामुळे सोशल मिडियाचा आंधळेपणाने वापर करून आले की बातमी शेअर करणाऱ्यांनी सोशल मिडीयावर आलेल्या बातमीची खात्री करूनच बातमी पुढे शेअर करावी.  



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies