या बँकांच्या निवडणुका वरील सरकारने स्थगिती उठवलीमुंबई : कोरोना या संसर्गजन्य विषाणुमुळे राज्य सरकारने बहुतांश जिल्हा बँकांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. परंतु सोमवार दिनांक 9 रोजी राज्य शासनाने या निवडणुकांची स्थगिती उठवली असून सर्व जिल्हा बँकांच्या मतदार याद्या अंतिम करण्याचे आदेश सहकार विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. यामुळे आता सातारा जिल्हा बँके सह राज्यातील इतर जिल्हा बँकेच्या स्थगित झालेला निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

मे 2020 मध्ये सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होणार होती. पण कोरोनाचे संकट असल्याने ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. गेली पावणे दोन वर्ष कोरोणाचे संकट असल्याने या कालावधीत जिल्हा बँकांच्या निवडणुका तब्बल पाच वेळा स्थगित झाल्या होत्या.  मुदत संपून मोठा कालावधी उलटल्यानंतरही निवडणूक घेण्यात आली नसल्याने हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले होते. यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागल्याने सरकारने 31 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली होती.

मात्र आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सहकार विभागाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला हिरवा कंदील दिला आहे. सरकारने आता अंतिम मतदार याद्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेची रणधुमाळी आता पुन्हा एकदा सुरू झाल्याने इच्छुकांची धांदल उडणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured