Type Here to Get Search Results !

"या" ठिकाणी शिवसेनेच्या वतीने छत्री वाटप

 


माणदेश एक्सप्रेस न्युज I दि. १६/८/२१ I पलुस : १५  ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने  शिवसेना पलूस तालुक्याच्या वतीने नागरिकांना पावसाळ्या मध्ये छत्र्या वाटप करण्यात आल्या.



पलूस तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या नेतृत्वाखाली छत्री वाटपाचा कार्यक्रम शहरातील प्रभाग १ पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना प्रशांत लेंगरे म्हणाले, प्रभाग एकमध्ये प्रत्येक घरी छत्री वाटप करण्यात आली असून यावेळी लोकांच्या अडचणी काय आहेत याचीही विचारपूस करण्यात आली. येणाऱ्या काळात शिवसेना  शहरात ताकतीने काम करेल. जर नागरिकांना काही समस्या असतील तर त्यांनी प्रत्यक्ष येवून भेटण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.





तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, पलूस शहराचा विकास म्हणावा तसा झाला नाही याची खंत आहे. शहरात पाण्याचा, गटारीचा, रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. त्याच बरोबर बेरोजगारी कमी करण्यासाठी आवश्यक उद्योगधंदे नाहीत. असे स्थानिक प्रश्न शहरांमध्ये व ग्रामीण भागामधील  प्रलंबित आहेत.  हे सर्व प्रश्नांची सोडवणूक येणाऱ्या काळामध्ये काळामधे शिवसेनेच्या माध्यमातुन सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणाले. यावेळी शहर संघटक अक्षय होनकळसे, अक्षय माने, सुरज सूर्वे, जगदीश पवार, गुंडा दिवाण, राजेंद्र होनकळसे, राहुल मदने, संजय कांबळे,  सौ. स्नेहल लेंगरे, सौ. दीपाली कांबळे, सौ. पुजा होनकळसे व शिवसैनिक उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies