Type Here to Get Search Results !

आठवडा बाजार सुरु-जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीसांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यात आज पासून आठवडा बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

आठवडा बाजारमध्ये कोव्हिड – 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते अगर कसे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी व पोलीस प्रशासन यांनी नियंत्रण ठेवावे. तसेच सदर आठवडा बाजार सुरु करताना संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील. असेही त्यांनी कळविले आहे.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies