Type Here to Get Search Results !

पोलिस बंदोबस्त असतानाही झरे येथे शर्यतीसाठी बैलगाड्या दाखल : आमदार पडळकर यांनी केले स्वागत

माणदेश एक्सप्रेस न्युज : दि. 19 : पोलिसांनी झरे पंचक्रोशीकडे येणारे सर्व रस्ते बंद केले असले तरी सुद्धा गनिमी काव्याने शेतकऱ्यांनी बैलगाडे झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या निवासस्थानी आणले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी आलेल्या बैलगाडा शेतकऱ्यांची आमदार गोपीचंद यांनी यावेळी स्वागत केले.


मा. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली असून याबाबत अजूनही सर्वोच्च न्यायालयातील याचिका दाखल आहे. नुकतीच राज्यातील बैलगाडा मालक संघटनेने झरे येथे गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन बैल गाडा मालकांच्या अडीअडचणी कथन केल्या व याबाबत सभागृहात आवाज हटवण्याची मागणी केली.


बैलगाडा संघटनेचे मालका पुढे बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याच ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे मैदान आयोजित करण्याची घोषणा केली. परंतु बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने प्रशासनाकडून ही बैलगाडा शर्यत होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. झरे पंचक्रोशीतील गावांमध्ये कलम 144 लागू करून संचार बंदी अंमलात आणली गेली. झरे गावाकडे येणारे सर्व बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले. तर नियोजित मैदानावर पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने चाऱ्या खोदून या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली होती.


परंतु बैलगाडा शर्यत सुरू होण्यास काही तासांचा अवधी असताना व सर्वत्र बंदोबस्त तैनात असतानाही शेतकऱ्यांनी गनिमीकावा करत झरे येथे बैलगाडे आणले आहेत. या आलेल्या शेतकऱ्यांचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वागत केले व कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत होणारच असे यावेळी सांगितले.
गनिमीकाव्याने शेतकरी बैलगाड्या सह झरे येथे दाखल झाल्याने पोलिसांची यंत्रणा काही प्रमाणात कमी पडल्याचे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies