....तर राज्यव्यापी बैलगाडा शर्यत भरवणार-आम. गोपीचंद पडळकर

झरे : येथे बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर
झरे : येथे बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार गोपीचंद पडळकर 

 

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/धिरज प्रक्षाळे : बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील बैलगाडा शर्यत संघटनेकडून भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांची त्यांच्या झरे ता. आटपाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन घेऊन बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आम. गोपीचंद पडळकर यांनी याबाबत सभागृहात आवाज उठविणार आहेच. परंतु आंदोलन म्हणून स्वतः  राज्यव्यापी बैलगाडा शर्यत भरवण्याचे आश्वासन दिले बैलगाडा शर्यत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील बैलगाडा शर्यती ७ मे २०१४ पासून बंद आहेत. त्या पुन्हा चालू करण्यासाठी राज्य सरकारने २०१७ मध्ये नवीन कायदा करून मंजूर केला असून बैलगाडा शर्यतींना नियम व अटींच्या अधीन राहत परवानगी दिली. परंतु, काही प्राणिमित्र संघटनांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ न स्थगिती मिळवली असून शर्यती बंद झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured