Type Here to Get Search Results !

पिक पेऱ्यासाठी आम.पडळकर शेतीच्या बांधावर



आटपाडी : "माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पिक पेरा" या सदरा नुसार आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपर तहसीलदार सचिन मुळीक यांचेकडून पीक पहाणी बाबत माहिती घेऊन त्यांनी त्यांचे स्वतःचे पीक पाहणी ही ई-ॲप द्वारे पूर्ण केली. 





यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, सदरचा ॲप हा वापरण्यास सोपा आहे. तो सर्व शेतकरी यांनी गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून घेऊन पीक पाहणी पुर्ण करावे असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांना अद्यावत पीक पाहणी सातबारा मिळेल, शासनाकडील विविध योजनांचा थेट लाभ मिळेल. पिक पाहणी निहाय क्षेत्र आकडेवारी सहज उपलब्ध होऊ शकेल. आधारभूत किंमत ठरविताना पिकाचे क्षेत्र व उत्पन्नाचा अंदाज काढणे, पिक कर्ज, पिक विमा योजना नुकसान भरपाई तसेच कृषी गणना  अचूकता इत्यादी फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत.




तरी सर्व शेतकरी बांधवांनी सदर ई-पिक ॲप द्वारे आपली पीक पाहणी नोंदवावी असे आवाहन ही आमदार पडळकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी अपर तहसिलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार ढेरे,  मंडळ अधिकारी मुगळीकर, तलाठी पवार, ऑपरेटर शंकर शिंदे, सनी लांडगे व शेतकरी बांधव उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies