Type Here to Get Search Results !

मॉडेल स्कूलच्या फलकाचे उद्घाटन संपन्न I सांगली जिल्ह्यात १४१ शाळांची मॉडेल स्कूल अंतर्गत निवड



माणदेश एक्सप्रेस न्युज I खरसुंडी I  वलवण ता. आटपाडी, जि. सांगली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मॉडेल स्कूल अंतर्गत निवड झाली आहे. या शाळेच्या डिजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले.




राज्याचे जलसंपदामंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात १४१ शाळांची मॉडेल स्कूल अंतर्गत निवड झाली आहे. गावातील शिक्षणप्रेमीनी ही शाळा जिल्ह्यामध्ये आदर्शवत बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाऊसो जाधव व आनंदराव जाधव यांनी शाळेसाठी पेविंग ब्लॉक देणार असल्याचे सांगितले. यावेळी आटपाडी पं.स गटविस्तार अधिकारी यांच्याहस्ते दानशूर ग्रामस्थांचा सत्कार घेण्यात आला.




कार्यक्रमास वलवण गावचे सरपंच दगडू गेजगे, उपसरपंच मारुती जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासो जाधव, आनंदराव जाधव, नाथा गेजगे, संतोष जाधव, मानसिंग भिसे, गजानन जाधव, रमेश जाधव, विलास गुरव, बाळासाहेब गुरव, शाळेचे मुख्याध्यापक धनाजी देठे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies