Type Here to Get Search Results !

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ‘एवढे’ नवे रुग्ण



माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोना या संसर्गजन्य रोगाने दुसऱ्या लाटेत थैमान घातले होते. मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने बाधित रुग्णांचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे अनेकांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचण निर्माण झाली होती.


परंतु आता मात्र दिलासादायक चित्र असून रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. आज दिनांक ३० रोजी कोरोनाचे ०२ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. आज आटपाडी शहर वगळता तालुक्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.


आजच्या बाधित मध्ये आटपाडी शहरामध्ये ०२ रुग्ण आहेत. बाधित मध्ये पुरुष रुग्ण ०१ तर स्त्री रुग्ण ०१ असे एकूण ०२ नवे रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies