Type Here to Get Search Results !

आंदोलन कायम ; आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत आटपाडी बस डेपोला कुलूप

 


आटपाडी  : गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. एसटीच्या प्रश्नावर काल राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. यावरूनच आता  भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.


गोपीचंद पडळकर यांनी सांगलीच्या आटपाडी बस डेपोला कुलूप घातले आहे. एसटीचं जो पर्यंत विलीनीकरण होत नाही. तो पर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार पडळकर यांनी केला आहे


राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे अशा वेळी ठाकरे सरकारमधील एक ही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही, असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला होता.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies