Type Here to Get Search Results !

भिंगेवाडी येथे पोटच्या मुलीवरच बापाचा लैंगिक अत्याचारआटपाडी : तालुक्यातील भिंगेवाडी येथे पोटच्या मुलीवरच बापाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत आटपाडी पोलिसात मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, भिंगेवाडी येथे मुलीची आई आपल्या दोन मुलीसह मोलमजुरी करून राहत आहेत. दोन महिन्यापुर्वी शनिवार दिनांक २९/१०/२०२१ रोजी भिंगेवाडी येथील राहत्या घरापासून आरोपीने मुलीचा बोरं आणूया म्हणून कॅनॉल जवळील चिलारीच्या झाडामध्ये घेवून गेला. यावेळी आरोपीने स्वत:च्याच १४ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. तर १२ वर्षीय मुलीवर बलात्कार केला.


यावेळी आरोपीने मुलींना सदरची घटना आईस सांगितले तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. आरोपीवर आटपाडी पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम ३७६, ३७६(२), (एफ)(जे), ३७६(३), ३५४(ए), ५०६ सह बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षक अधिनियम २०१२ सि कलम 4, ६, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर घटनास्थळी उपविभागीय अधिकारी विटा तसेच पोलीस पोलीस निरीक्षक निंभोरे यांनी भेट दिली असून सदर घटनेचा अधिक तपास सपोनि पाटील करीत आहेत. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies