Type Here to Get Search Results !

ग्राहकांच्या सेवेसाठी चौंडेश्वरी पतसंस्था दिनांक०१ पासून सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु

आटपाडी : सांगली जिल्हा आदर्श पतसंस्था म्हणून गौरवलेली चौंडेश्वरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आता आटपाडी तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी दिनांक ०१ नोव्हेंबर पासून सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरु राहणार आहे.


संस्थेच्या वतीने ग्राहकांच्या सेवेसाठी वीज बील भरणा केंद्र सुरु करण्यात आले असून NEFT व RTGS सुविधेद्वारे भारतात  कोठेही पैसे पाठविण्याची सोय आहे. त्याचबरोबर मोबाईल व DTH रिचार्ज सोय हि उपलब्ध आहे. सोनेतारण, वाहन तारण, मशिनरी तारण व इतर व्यवसायिक कर्जाची सोय सुद्धा उपलब्ध आहे. त्याच बरोबर संस्थेमध्ये कोणत्याची नॅशनल बँकेचे पैसे काढण्याची सुविधा आहे. ठेवीबरोबर मिळणाऱ्या व्याजास TDS कपात केला जात नाही.


ठेवीवर आकर्षक व्याजदार असून यामध्ये ४६ दिवस पुर्ण ८.५ टक्के, ९२ दिवस पुर्ण ९ टक्के, १८२ दिवस पुर्ण ९.५ टक्के, १२ महिने पुर्ण १० टक्के तर ६ वर्ष १ महिना १२ दिवसात दामदुप्पट ठेव योजना सुरु आहे. त्याचबरोबर सोने तारणामध्ये १ तोळा सोन्यास ४० हजार रुपये कर्ज उपलब्ध आहे.


संस्थेकडे खेळते भांडवल १५ कोटी २८ लाख रुपये असून ठेवी १० कोटी ४३ लाख रुपयांच्या आहेत. संस्थेने आजपर्यंत १० कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. २ कोटी ९० लाख रुपयांची संस्थेची गुंतवणूक असून भागभांडवल १ कोटी २२ लाख रुपये तर स्वनिधी २ कोटी ९० लाख रुपये आहे. 


संस्थेस सतत ऑडिट वर्ग ‘अ’ असून संपूर्ण संस्था संगणकीकृत आहे. त्याचबरोबर विविध आर्थिक गरजेसाठी विनाविलंब तत्पर कर्ज पुरवठा देखील केला जात आहे. अनुभवी व कार्यक्षम संचालक मंडळ व सेवक वर्ग यांच्यामुळे हे शक्य असल्याचे संस्थेचे सचिव बालक डोईफोडे म्हणाले.
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies