घरनिकीत कोविड योद्ध्यांचा गौरव : माजी सभापती 'यांचे' स्मरणार्थ सन्मानपत्रखरसुंडी/प्रतिनिधी : घरनिकी (ता.आटपाडी) येथे वैद्यकीय क्षेत्रातील कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.उस्मान नबीसो शेख यांच्या स्मरणार्थ आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आटपाडी तालुक्याचे नेते तानाजी पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, सरपंच विक्रम दाईंगडे प्रमुख उपस्थित होते.


कोरोना महामारीच्या संकटसमयी खंबीरपणे कार्यरत राहून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय जनसेवा केली. घरनिकी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तुकाराम भांगे, आरोग्य सेवक प्रकाश नलवडे, आरोग्य सेविका सुवर्णा कांबळे, आशा सेविका पुष्पा सोनवणे, संध्याराणी कदम, रंजना बेरगळ, आशा कदम यांच्यासह शिक्षकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी उपसरपंच विद्या पवार, ग्रा.पं. सदस्या यास्मिन काझी, सदस्य आप्पासो पवार, माजी सरपंच सलीम उस्मान शेख यांच्यासह जावेद काझी, बंडोपंत पवार, लाला तोरणे, शिवाजी येळे, शहाजी तोरणे, शिवाजी खैरमोडे, आबीद शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured