Type Here to Get Search Results !

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्ज बरोबर ‘या’ संघाची होणार फायनलसाठी लढतशारजा : चेन्नई सुपर किंग्ज बरोबर केकेआर संघाची फायनलसाठी लढत होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आज झालेल्या सामन्यात केकेआर ने दिल्लीचा पराभव केला. कोलकाताच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल करताना दिल्लीच्या धावगतीवर लगाम लावली.


केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिली दोन षटकं सावधपणे खेळून काढली, पण तिसऱ्याच षटकात पृथ्वीनं खणखणीत षटकार खेचून चेंडू स्टेडियमबाहेर फेकला. त्या षटकात १२ धावा जोडल्यानंतर शिखऱ धवननं KKR चा स्टार गोलंदाज सुनील नरेन याची धुलाई केली. सलग दोन षटकार खेचून त्या षटकात १४ धावा जोडल्या. पण, वरुण चक्रवर्तीने केकेआरला यश मिळवून देताना पृथ्वीला (१८) बाद केले. पृथ्वीच्या विकेटनंतर दिल्लीची धावसंख्या मंदावली, KKRच्या गोलंदाजांनी  सुरेख कामगिरी केली. मार्कस स्टॉयनिसने दुसऱ्या विकेटसाठी गब्बरसह सावध भागीदारी केली, परंतु शिवम मावीनं त्याचा (१८) त्रिफळा उडवला. १५ व्या षटकात शिखर धवन (३६) धावांवर चक्रवर्तीचा शिकार बनला. तर रिषभ पंत फक्र हजेरी लावण्यापुरताचा आला. 


शेवटच्या काही षटकामध्ये फटकेबाजी करीत दिल्लीला २० षटकांत ५ बाद १३५ धावाच करता आल्या. सुनील नरीनने ४ षटकांत २७ धावा दिल्या, तर ल्युकी फर्ग्युसननं २६ धावांत १ विकेट घेतली. अय्यर ३० धावांवर नाबाद राहिला.


प्रत्युतर केकेआरच्या व्यंकटेश अय्यर व शुभमन गिल यांनी शानदार सुरुवात केली. ९६ धावांची सलामी भागीदारी केली. यामध्ये व्यंकटेश अय्यरने फटकेबाजी करीत ४१ चेंडूत ३ षटकार व ४ चौकार करीत ५५ धावांची खेळी केली. रबाडाने व्यंकटेशला स्मिथ करवी झेलबाद केले. त्यानंतर आलेला नितीश राणा १३ धावा काढून बाद झाला. नॉर्कीयाचा शिकार झाला. पाठोपाठ गिल ला देखील आवेश खान ने बाद केले. तर पाठोपाठ दिनेश कार्तिकचा रबाडाने त्रिफळा उडविला तर कप्तान मोर्गन चा नॉर्कीयाचा ने त्रिफळाचीत केल्याने सामना दिल्लीचा बाजूने फिरवीत केकेआरच्या गोटात शांतता पसरविली. 


शेवटच्या षटकात ७ धावा पाहिजे असताना शकीबला अश्विनने त्रिफळाचित केले. तर नरेन देखील झेलबाद झाल्याने केकेआरच्या आशा संपुष्टात आल्या होत्या. परंतु राहुल त्रिपाठी ने अश्विनला षटकार मारत अंतिम फेरीत धडक मारली. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies