Type Here to Get Search Results !

अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आलीय, पण...

 


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्जवाटपा प्रकरणी बँकेला ईडीने नोटीस धाडली आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी बँकेकडे माहिती मागितली होती. मात्र, बँकेच्या संचालकांनी ही माहिती उदयनराजेंना देण्यास देण्यास नकार दिला. यानंतर खासदार उदयनराजे भोसले भडकले आणि त्यांनी ही बँक बँकच राहूद्या, गोरगरिबांची ती अर्थवाहिनी आहे असे आवाहन त्यांनी केले आहे.


खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी पॅनलवर निशाणा साधला आहे. सातारा जिल्हा बँकेच्या पॅनेलमध्ये मला घेणारे ते कोण?, मी ठरवतो कुठे जायचे ते. माझी जिरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की भले मला विरोध करा पण सभासदांची जिरवू नका. अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आली आहे. मी कुणाचा दुश्मन नाही. मेहरबानी करा माझी विंनंती आहे हात जोडून विनंती करतो ही बँक शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहू द्या. त्यांची अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका, असे आवाहन उदयनराजेंनी केले आहे. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies