नाम तो सुना ही होगा, ‘राहुल त्रिपाठी’ : दिल्ली खेळाडूंच्या मनात कायम सल राहणारआटपाडी : आज झालेल्या दिल्ली व कोलकाता सामन्यात दिल्लीवर मात करीत कोलकाताने आयपीएलच्या अंतिमसाठी धडक दिली. परंतु सामन्यावर पकड मिळविलेल्या दिल्लीच्या संघाला राहुल त्रिपाठीने असा काहीसा ४४० चा झटका दिली की, तो कायम दिल्लीच्या खेळाडूंच्या मनात कायम राहणार आहे. 


केकेआरला शेवटच्या षटकामध्ये ७ धावांची गरज होती. दिल्ली कडून अनुभवी अश्विनने आपला अनुभव पणाला लावत केकेआरला गुडगे टेकायला लावत या षटकात ऑलराऊडर शकीब व नरेन यांना पाठोपाठ बाद करीत सामना पुर्णपणे दिल्लीच्या बाजुने फिरविला.


शेवटच्या २ चेंडूत ६ धावांची गरज असताना युवा राहुल त्रिपाठीने अश्विनीला षटकार ठोकत दिल्ली संघाचे अंतिम फेरीत पोहचण्याच्या स्वप्नावर पाणी फिरवित, नाम तो सुना ही होगा, ‘राहुल त्रिपाठी’ असे म्हणत आपल्या नावाची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured