Type Here to Get Search Results !

श्री. शंकर सहकारी साखर कारखानाचा गळीत हंगाम शुभारंभ ‘यांच्या’ हस्ते संपन्नमाळशिरस/विष्णू भोंगळे :  श्री. शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर या साखर कारखान्याचा सन २०२१-२२ ऊस गळीत हंगाम शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील, सहकार महर्षी चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांचे शुभहस्ते पार पाडला. 


यावेळी सर्वप्रथम वजन काटा व बैलगाडी पूजन त्यानंतर गव्हाण व कारखाना ऊस गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सहकार महर्षी काकासाहेब व आक्कासाहेब तसेच कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष कुचेकर व जेष्ठ सभासद जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.


या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांची निवड शंकर सहकारी चे संचालक दत्तात्रय रणवरे यांनी केली तर संचालक शिवाजी गोरे यांनी त्यास सर्वानुमते अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकर सहकारी चे व्हा. चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर मनोगत सहकार महर्षी चे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शंकर सहकारी चे चेअरमन, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे आ. राम सातपुते यांनी केले. आभार संचालक बाबाराजे देशमुख यांनी मानल. यावेळी ऊस बैलगाडी मालक शेतकरी दादा नाईकनवरे व प्रथम ऊस घालणारे सभासद शेतकरी पं. स.माळशिरस चे माजी उपसभापती शंकरराव भानवसे यांचे सत्कार करण्यात आले. 


कार्यक्रमास राजसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, आम. राम सातपुते, सौ.सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, जि.प.माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, जि.प. सदस्या संगिता मोटे, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, पं. स. माळशिरस च्या सभापती सौ. शोभाताई साठे, माजी सभापती सौ. वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती प्रताप पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती बाळासाहेब होले, लेबर फेडरेशन चे माजी चेअरमन भारतनाना पाटील, शंकरराव मोहिते पाटील सुतगिरणीचे चेअरमन आप्पासाहेब काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी उपसभापती संग्रामसिंह जहागीरदार, माजी उपसभापती गणपतराव वाघमोडे, शिवामृत दूध संघाचे व्हा. चेअरमन सावता ढोपे, माळशिरस चे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भाजपा चे तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, सहकार महर्षी  चे कार्यकारी संचालकश्री. चौगुले, आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले, कार्याध्यक्ष मिलिंद सरतापे, पं. स. सदस्य अर्जुन धाइंजे तसेच शंकर सहकारी चे संचालक शंकर सहकारी चे कार्यकारी संचालक रविराज जगताप, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक मंडळ, शिवामृत दूध संघाचे संचालक मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ तसेच विविध सहकारी सोसायटी चे चेअरमन, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, सदस्य, शेतकरी, सभासद, सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, इतर पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies