Type Here to Get Search Results !

क्रुरतेचा कळस ; पोटच्याच मुलीवर बापाचा अत्याचार





डोंबिवली : आपल्या पोटच्या ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधम बापानं अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. इतकंच नव्हे, तर आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला जबरदस्ती दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित डोंबिवलीमध्ये आई वडिलांसोबत राहते. मुलींची आई कामानिमित्त गावाला गेल्याची संधी साधून बापाने पीडितेवर  लैंगिक अत्याचार केले.


शिवाय तिला शिवीगाळ, मारहाण करत धमकी ही दिली. याबाबत घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सर्व प्रकार सांगितला. याच दरम्यान आरोपी बाप मद्यधुंद अवस्थेत घरी येऊन भांडायचा, आठ महिन्याच्या मुलीला दारू पाजायचा. याला विरोध करणाऱ्या आपल्या पत्नीला देखील बेदम मारहाण करायचा. रोजच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीच्या आईने हिंमत केली आणि विष्णूनगर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies