Type Here to Get Search Results !

आटपाडी येथील एन.एस.पवार यांचे निधन



आटपाडी : आटपाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले जेष्ठ बौद्धाचार्य एन.एस.पवार  यांचे आज दिनांक १४ रोजी सायंकाळी ७.३० च्या दरम्यान आकस्मित निधन झाले.


आटपाडी तालुक्यामध्ये आंबेडकरी विचार सर्वदूर पोहचविण्याचे काम एन.एस.पवार  यांनी केले. त्याचबरोबर त्यांनी  बौद्धाचार्य म्हणून काम केले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये बदल घडविण्याबरोबरच समाज सुधारणेसाठी मोठे काम केले.


त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना फुले, शाहु, आंबेडकर विचारमंच आटपाडीच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार दवून गौरविण्यात आले होते. त्यांच्या या निधनाने आंबेडकरी जनतेवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज आटपाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies