Type Here to Get Search Results !

20 World Cup : न्यूझीलंडचे स्वप्न अधुरेच : ऑस्ट्रेलिया प्रथमच 20-20 वर्ल्डकपचा विश्वविजेता20 World Cup : सलग दुसऱ्या टी-२० च्या वर्ल्डकप सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला असून ऑस्ट्रेलियानं प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मिळविला आहे. डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांच्या वैयक्तिक अर्धशतकांनी न्यूझीलंडचे स्वप्न अधुरेच ठेवले.


प्रथम फलंदाजी करताना केन विलियम्सनने कर्णधाराला साजेशी खेळी केली.  डॅरील मिचेल (११) धावावर माघारी परतल्यानंतर केन व मार्टीन गुप्तील यांनी संयमी खेळी करून विकेट टिकवून ठेवली. न्यूझीलंडच्या पहिल्या दहा षटकांत १ बाद ५७ धावा झाल्या होत्या. त्यानंतर केननं सूत्र हाती घेताना तुफान फटकेबाजी केली. ११-१६ षटकांत न्यूझीलंडनं १ विकेट गमावून ७९ धावा चोपल्या. मार्टीन २८ धावांवर माघारी परतला. 


केनसह त्याची ४५ धावांची भागीदारी संपुष्टात आली. या विकेटनंतर केननं धावांची गती वाढवली, त्यानं ग्लेन मॅक्सवेलला दोन खणखणीत षटकात खेचून ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. केन व ग्लेन फिलिप्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६८ धावा जोडल्या आणि त्यापैकी ४६ धावा या केनच्याच होत्या.  केननं ४८ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८५ धावा केल्या. हेझलवूडने त्याची विकेट घेतली. हेझलवूडनं ४ षटकांत १६ धावांत ३ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडनं २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या.


प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवार खराब झाली. कर्णधार अॅरोन फिंच (५) लवकर बाद झाला. डॅरील मिचेलनं अप्रतिम झेल टिपला. १५ धावांवर पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सारवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात फॉर्मात परतलेल्या वॉर्नरने किवी गोलंदाजांवर प्रहार केला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला पहिल्या १० षटकांत १ बाद ८२ धावा उभारून दिल्या. वॉर्नरने ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्रेंट बोल्टने १३ व्या षटकात त्याचा त्रिफळा उडवला. वॉर्नर ३८ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावांवर माघारी परतला. वॉर्नरपाठोपाठ मिचेल मार्शनं अर्धशतक पूर्ण केले.


मार्श व ग्लेन मॅक्सवेल जोडीनं दमदार खेळ केला. मार्श ५० चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला. मॅक्सवेलनं नाबाद २८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं १८.५ षटकांत विजय मिळवला. आणि प्रथमच टी-२० च्या वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies