Type Here to Get Search Results !

विटा येथील “या” सामाजिक कार्यकर्त्याला “समाजरत्न पुरस्कार” प्रदान



विटा : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने सामाजिक  चळवळीतील कार्यकर्ते व अग्रणी सोशल फौंडेशनचे सचिव मुनीवर सुलताने यांना‌  समाजरत्न  पुरस्काराने गौरविण्यात आले.


सहकार दिन व बालदिनानिमित्त  सांगलीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात काँग्रेस सेवादलाच्या वतीने राजकीय, सामाजिक, आर्थिक, पत्रकारिता, साहित्य, क्रिडा, शैक्षणिक,कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 50 मान्यवरांना सेवादल पुरस्कार  प्रदान करण्यात  आले. यापैकी सामाजिक   क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुनीवर सुलताने यांचा समाजरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. 


सांगली जिल्ह्यातील विविध पुरोगामी व्यवस्था परिवर्तनवादी, डाव्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती,विद्रोही सांस्कृतिक परिषद, भटकेविमुक्त विकास फोरम, मुस्लीम सत्यशोधक मंडळ या संघटनेचे ते सक्रिय सदस्य आहेत. तसेच विटा येथील अग्रणी सोशल फौंडेशन विटाच्या माध्यमातून त्यांनी तासगाव,  खानापूर व आटपाडी तालुक्यातील भटकेविमुक्त जमाती, एकल महिला, अल्पसंख्याक व दिव्यांग  समूहाच्या विकास व सक्षमीकरणासाठी बहुमोल योगदान दिले आहे. ते संविधान प्रचारक, विधी सेवा समितीचे विधीसेवक, माहिती अधिकार संघटनेचे संघटक व एम.एस.डब्ल्यू पदवीधर तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. 


वरील सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सेवादलाचे राष्ट्रीय सरचिटणीस लालजी मिश्रा, दलजगतचे संपादक श्री. बाजोरिया, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, काँग्रेसचे नेते यशवंत हाप्पे, सांगली सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले,  महाराष्ट्र महिला प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जिल्हाध्यक्षा वृषाली वाघचौरे तसेच जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी  उपस्थित होते. श्री.सुलताने यांना समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies