Type Here to Get Search Results !

खेलो इंडिया ॲथलेटीक्स प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक नियुक्तीसाठी १८ नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करा : जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आवाहनसांगली : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या अंतर्गत खेलो इंडिया योजनेमधून जिल्हा क्रीडा संकुल, सांगली येथे खेलो इंडिया ॲथलेटीक्स प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण केंद्राकरिता खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तात्पुरत्या स्वरुपात प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांनी दि. 18 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी केले आहे.


तात्पुरत्या स्वरुपात प्रशिक्षक नियुक्तीसाठी अर्हता पुढीलप्रमाणे. उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्षे असावे, ऑलिम्पिक / एशियन गेम्स / जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग/पदक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षणाचा अनुभव, जागतिक करंडक स्पर्धा / एशियन चॅम्पियनशिप / साऊथ एशियन स्पर्धा / संबंधित खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग/पदक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षणाचा अनुभव, राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कार्थी उमेदवार व प्रशिक्षणाचा अनुभव, एन.आय.एस. पदविका किंवा संबंधित खेळाचे अधिकृत लेवले कोर्सेस किंवा बी.पी.एड-एम.पी.एड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त खेळाडू व प्रशिक्षणाचा अनुभव, राज्यस्तर खेळाडू बी.पी.एड-एम.पी.एड सह कमीत कमी १० वर्षे प्रशिक्षणाचा अनुभव.


वरीलप्रमाणे अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपले अर्ज गुरुवार, दि. १८ नोव्हेंबर, २०२१ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, साई फिटनेस सेंटर, नविन इमारत, मालु हायस्कूल समोर, गुलमोहर कॉलनी, दक्षिण शिवाजी नगर, सांगली येथे समक्ष सादर करावेत. तसेच अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक, प्रशांत पवार (मो.नं. 9402968625), सीमा पाटील (मो.नं. 9403123743), आरती हळींगळी (मो.नं. 8411942424) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले आहे. 
Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies