आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येवू लागली आहे. गेली चार दिवस झाले रुग्ण संख्या दोन आकडी येत असून यातून संसर्ग वाढू होवू शकतो. आज ४१ रुग्णांची नोंद तालुक्यात झाली आहे. तर १८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना महामारीच्या निर्बंधाचे पालन करणे आवश्यक आहे.
आज दिनांक १८ रोजी अचकदाणी ता. सांगोला ०१, आटपाडी २४, आवळाई ०१, बाळेवाडी ०१, गोमेवाडी ०२, करगणी ०१, कौठुळी ०१, लोटेवाडी ता. सांगोला ०१, माडगुळे ०२, निंबवडे ०१, राजेवाडी ०१, शेटफळे ०२, विठ्ठलापुर ०३ या गावातील बाधित रुग्ण आहेत.
रूग्णामध्ये पुरुष रुग्ण २६ व स्त्री रुग्ण १५ असे एकूण ४१ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.