म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या केंद्रीय कार्यालयातून सन 2022 या वर्षाकरिता जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पत्रकार पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी आण्णासाहेब कोळी यांची निवड महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी जाहीर केली आहे.
आण्णासाहेब कोळी हे गेले 21 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे कार्यरत आहेत. सद्या ते पत्रकार टाइम्सचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच त्यांनी विधान परिषद सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पहिले आहे. ते विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्रा मध्ये प्रशासकीय मंत्रालयीन कामकाज पाहत आहेत. यासोबतच महाराष्ट्रा मध्ये महायुतीचे घटक संघटना कोळी महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर ते सध्या कार्यरत आहेत.
संपूर्ण राज्यभर त्यांचा संपर्क असल्याने याच कार्याची दखल घेत महाराष्ट्र पत्रकार संघाने त्यांची राज्य संपर्क प्रमुख पदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.