आटपाडी : आटपाडी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाट येवू लागली आहे. गेली दोन दिवस झाले रुग्ण संख्या दोन आकडी येत असून यातून संसर्ग वाढू होवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या कोरोना महामारीच्या निर्बंधाचे पालन करणे आवश्यक आहे.
आज दिनांक १३ रोजी तालुक्यातील करगणी ०१, शेटफळे ०२, आटपाडी ०६, भिंगेवाडी ०१, जांभूळणी ०३, खरसुंडी ०१ या गावातील बाधित रुग्ण आहेत.
रूग्णामध्ये पुरुष रुग्ण १० व स्त्री रुग्ण ०४ असे एकूण १४ नवे रुग्ण तालुक्यात आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.