Type Here to Get Search Results !

मटका घेताना एकाला अटक I आटपाडी पोलीसांची कारवाई



आटपाडी : आटपाडी बस स्थानक परीसरामध्ये रिक्षा थांब्याशेजारी कल्याण नावाचा मटका जुगार घेताना एकाला आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने अवैध व्यवसाया विरुद्ध सुरु असलेली कारवाई चालूच ठेवली आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना गोपिनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, आटपाडी बस स्थानक परिसरामध्ये कल्याण नावाचा मटका सुरु आहे. याबाबत खात्री केल्यानंतर सदर ठिकाणी धाड टाकली असताना अजित रामचंद्र गुळीग व.व. २८ रा, गौडवाडी ता.सांगोला, जि. सोलापूर हा आरोपी जुगाराचा खेळ लोकांच्याकडून स्वीकारून त्यांना मोबाईल वरून मटक्याचे आकडे देवून त्याचा बुकी मालक प्रकाश ऐवळे रा. कमलापूर ता. सांगोला यांच्याकडे १० टक्के कमिशनवर काम करत होता. 


छाप्यावेळी त्याच्याकडे मोबाईल, मटक्याची चिट्ठी, रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. आरोपीविरुद्ध दादासाहेब ठोंबरे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये पोहेकॉ गणपत गावडे, पोना उमर फकीर, पोकॉ प्रमोद रोडे यांनी सहभाग घेतला. सदरची कारवाई दिनांक १७ रोजी करण्यात आली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies