कोरोना योध्दा कै.डॉ. भरत कारंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण : कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे कुटुंबियांचे आवाहनम्हसवड/प्रतिनिधी : कोरोना योध्दा कै.डॉ. भरत कारंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन शनिवार दिनांक १५ जानेवारी रोजी दहिवडी ता. माण, जि. सातारा येथे साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कारंडे कुटुंबियांनी केले आहे.


माण तालुक्यातील कुक्कडवाढ अंतर्गत असलेल्या कारंडेवाडी येथे डॉ. भरत हरिबा कारंडे यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. कायम दुष्काळी परिस्थितीमुळे अठरा विश्व दारिद्र्य आणि कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना कुशाग्र बुद्धीच्या जोरावर भरत कारंडे हे डॉक्टर झाले आणि त्यांनी दहिवडी येथे हॉस्पिटल उभारुन वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अनेक वर्षे त्यांनी रुग्ण सेवा करुन गरिबांचा डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळविला होता.


रुग्ण सेवा करत असताना त्यांनी नेहमीच माण तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य ही केले होते. कोरोना काळात त्यांनी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा समजून अनेक कोरोना रूग्णांना जीवदान दिले मात्र त्यांनाच कोरोनाची लागण झाली आणि खऱ्या अर्थाने कोरोना योध्दा असलेल्या डॉ. भरत कारंडे अनंतात विलीन झाले.


शनिवार दिनांक १५ जानेवारी रोजी सेवानिवृत्त अप्पर पोलीस आयुक्त मधु शिंदे यांचे हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून दहिवडी येथे किरण हॉस्पिटल येथे १२.०५ मिनिटांनी पुष्पवृष्टी करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन कारंडे कुटुंबियांनी केले आहे.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured