Type Here to Get Search Results !

स्वाधार योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास "या" दिनांका पर्यंत मुदतवाढ



सांगली : शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करण्याबाबतच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.


सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या हद्दीतील तसेच हद्दीपासून 5 कि.मी.परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्थामधील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणूऩ भोजन भत्ता, निवास भत्ता तसेच शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये शासन निर्णयानुसार जमा करण्यात येते. त्याअनुषंगाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सन 2020-21 व सन 2021-22 मधील पात्र विद्यार्थ्यांनी दि. 31 डिसेंबर 2021 अखेर अर्ज सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश होते. तथापि, सदर मुदतीस दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी संबंधितांनी सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली) यांच्याकडे अर्ज सादर करावेत.


त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमातील प्रवेशित विद्यार्थ्यांनी सांगली जिल्ह्यातील 21 तालुकास्तरीय मुला/मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुरक व पात्र विद्यार्थी विद्यार्थीनीनी संबंधित अधिक्षक / अधिकक्षिका यांच्याकडे वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी 0233-2374739 या दूरध्वनीवर, acswosangli@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies