Type Here to Get Search Results !

जीवन आनंदाने जगावे I संजय काळे I वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त कार्यक्रमतासगाव : ज्याला जगण्यातलं मर्म कळते तीचं लोक आनंदाने जगतात, प्रत्येकाने जीवन आनंदाने जगावे असे उद्गार संजय काळे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासकेंद्राच्या वतीने आयोजित 'या जन्मावर शतदा प्रेम करावे ' या कार्यक्रमात बोलताना काढले. 


ते पुढे म्हणाले, संकटावर मात करता आली पाहिजे. अपेक्षा कधीच पूर्ण होत नाहीत म्हणून प्रत्येकानं समाधानानं जगावे. नियमित व्यायाम व योग्य आहार यांचा समतोल साधून कोरोना सारख्या संकटावरही मात करता येते हे त्यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ  विद्यार्थ्यांची अधुरी स्वप्ने पूर्ण करते. या अभ्यास केंद्रात शिक्षण घेऊन विविध अधिकार पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांनी ओळख करून दिली.


अध्यक्षस्थानावरून बोलताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा. आण्णासाहेब बागल यांनी मुक्त विद्यापीठा मार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांचा परिचय करून दिला. त्याचबरोबर 'ज्ञानगंगा घरोघरी' या ब्रीदवाक्य ने काम करत असलेल्या विद्यापीठाची माहिती दिली. प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. अश्विनी देशिंगे यांनी केले. तर आभार प्रा.एच.एल. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पुष्पलता गुरव यांनी केले. कार्यक्रमाला प्रा.एच.एस. काळे, प्रा.व्ही.ए.चव्हाण, प्रा.एस.एस. यमगर यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी कोविड १९ नियमांचे पालन करून उपस्थित होते.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies