Type Here to Get Search Results !

“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे” I व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया



मुंबई :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल भाजपकडून टीका करण्यात येवू लागल्यानंतर महराष्ट्र प्रदेश काँगेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिला आहे. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते, असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे. ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याबाबतीत नव्हते असे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.



“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे.


काय म्हणाले होते नाना पटोले?

“मी का भांडतो? गेल्या ३० वर्षापासून मी राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदींना मारु शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले. एक प्रामाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….,” असे नाना पटोले या व्हायरल व्हिडीओमध्ये बोलत असताना दिसत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies